सेल्फीचा शोध कधी लागला

👉 _*सेल्फीचा शोध कधी लागला?*

कळत-नकळत ’सेल्फी’ आता आपला आयुष्याचा भाग बनलाय. आयुष्यातले अनेक क्षण सेल्फीतून साठवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? या सेल्फीचा शोध हा काही नवा नाही. तर संग्रहणांमधील माहितीनुसार सेल्फी नवीन नसून 100 वर्षांपूर्वीच त्याचा शोध लावल्याचे समोर आले आहे.

सर्वात जुना आणि पहिला सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलुइस यांनी काढला होता. त्या काळातील तंत्रज्ञानानुसार कमीत कमी 15 मिनिटं ते एकाच ठिकाणी एकाच पोजमध्ये उभे राहीले असणार. 1914 मध्ये रशियातील अनास्तासियाने तेराव्या वर्षी सेल्फी काढला होता. आपल्या वडीलांना दिलेल्या पत्रामध्ये ‘मी आरशात पाहून स्वत: चा फोटो काढला, पण हे खूप कठीण होते कारण फोटो काढताना माझे हात थरथरत होते’ असं तिने लिहीले आहे.

न्यूयॉर्कच्या जोसेफ बायरोनने 1920 मध्ये आपल्या मित्रांसह छतावर पहिला ग्रुप सेल्फी काढला होता. त्यावेळी कॅमेरा इतका मोठा आणि जबरदस्त होता की, तो कॅमेरा हाताळण्यासाठी दोन वेगळ्या व्यक्ती होत्या. 1966 मध्ये ताजमहलसमोर एका 23 वर्षीय तरुणाने सेल्फी काढला होता. मानवानंतर प्राणीदेखील सेल्फी घेण्यात मागे राहीले नाहीत.

2011 मध्ये, कॅमरामॅन डेव्हिड स्लैटरच्या कॅमेऱ्यातून एका ब्लॅक मकाऊने सेल्फी काढला होता. या फोटोच्या मालकीवरील वाद न्यायालयात पोहोचला होता. 2013 मध्ये सेल्फी हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून समाविष्ट करण्यात आला होता. 2014 मध्ये हॉलिवुड स्टारचा ग्रुप सेल्फी सर्वात जास्त शेअर केला गेला.

अशाप्रकाची माहिती मिळवण्यासाठी Rocking Funs Channels ला subscribed करा

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी

👉 _*काम करताय? डोळ्यांची काळजी घ्या!*_

*Rocking Funs Health katta

हल्ली डोळ्यांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. स्मार्टफोन, संगणक तसेच इतर विविध कारणांनी सातत्याने आपल्या डोळ्यांवर ताण पडत असतो. कित्येकदा आपण डोळ्यांना त्रास होतील अशा गोष्टी वारंवार करत असतो. अशाच चुका टाळण्यासाठी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊयात...

1) जर तुम्ही काम करत असाल तर डोळ्यांची सतत उघडझाप करत राहा. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणार नाही. तसेच डोळे जळजळण्याची समस्या कमी होईल.

2) दिवसातून कमीत-कमी 4 ते 5 वेळा डोळे थंड पाण्याने धुवा. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा कमी होईल.

3) कामाच्या वेळी दिवसातून दोन-वेळा डोळ्यांचा व्यायाम करा. पाच मिनिटे डोळ्यांची बुब्बुळे उजव्या आणि डाव्या बाजूला फिरवा.

4) संगणक किंवा लॅपटॉपवर काम करताना खोलीतील विजेचा दिवा सुरू ठेवा. यामुळे कॉम्प्युटरमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाशाचा डोळ्यांवर कमी परिणाम होईल.

5) संगणकावर किंवा कोणतेही काम करताना दर चाळीस मिनिटांनंतर विश्रांती घ्या. 5 मिनिटे डोळे बंद ठेवा. यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल.

6) चेहरा व डोळे यांच्या स्नायूंना आराम मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी  जास्तीत जास्त पाणी प्यावे व खिडकीतून बाहेर पहावे. हिरवळीकडे पाहणे डोळ्यांसाठी चांगले आणि फायदेशीर आहे.

7) ओलाव्याच्या अभावामुळे डोळ्यांना खाज सुटते. तसेच डोळे लालसर होतात आणि डोळ्यांची जळजळ होते. त्यामुळे काम करते केळी डोळ्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये.

8) वारंवार डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, खाज सुटणे या समस्या असतील तर डॉक्टरांना भेटा.

Rocking Funs

बड्या कंपनीच्या लोगो चा अर्थ

विविध ब्रॅन्ड आणि लोगोचा अर्थ

आपल्या विविध वैशिष्ट्यमुळे अनेक ब्रॅन्ड प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे लोगो सुद्धा प्रसिद्ध आहेत. काहीना काही अर्थ प्रत्येक बॅन्डच्या लोगोमध्ये दडलेला असतो. पण या लोगोचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? नाही ना? तर मग आज त्याबाबत जाणून घेऊयात...

1) _*गुगल*_ : जगात सर्वात जास्त वापरले जाणारे सर्च इंजिन म्हणजे गुगल.  याबद्दल फार काही वेगळं सांगायला नको. गुगलच्या लोगोमध्ये पाठोपाठ प्राथमिक रंगसंगती वापरण्यात आली आहे आणि नंतर दुय्यम रंग वापरण्यात आला आहे. यात जाणीवपूर्वक रंगांचा हा मेळ करण्यात आला आहे. गुगलला यातून हे दर्शवायचे आहे की, त्यांनी लोगो बनवण्यासाठी कोणतेही नियम आखले नाहीत. लोगो कशाप्रकारेही अवाढव्य किंवा समजण्यास कठीण नाही. हेच दर्शवण्यासाठी गुगलच्या लोगोमध्ये सरळ शब्द आणि रंग वापरण्यात आले आहेत.

2) _*आदिदास*_ : आदिदास ही जर्मनीची कंपनी असून अॅडॉल्फ डॅसलर यांनी 1948 साली या कंपनीची स्थापन केली. त्यांच्याच नावातील आणि आडनावातील शब्द कंपनीच्या नावात समाविष्ट करण्यात आले आहेत. आदिदास ब्रॅन्डचा लोगो डोंगर मार्गातील अडथळा भासवतो. खरंतर आधीच्या लोगोमध्ये फक्त तीन स्ट्रीप्स दिल्या होत्या. या लोगोमध्ये फार काही अर्थ नव्हता. त्यांनी नंतर फक्त हे तीन स्ट्रीप्स डोंगरासारखे तिरपे दिसतील या पद्धतीने दर्शवले आहेत.

( _*अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_  https://goo.gl/FFRM5p )

3) _*एनबीसी*_ : एनबीसी’ची मालकी 50 च्या दशकात ‘आरसीए’कडे होती आणि नुकतीच त्यांनी रंगीत टिव्हींची निर्मिती करायला सुरूवात केली होती. त्या काळात जास्त लोक हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट टिव्हीच बघायचे. त्यांना दिसते ती वस्तू किंवा प्राणी कलरफुल असूनही ब्लॅक अॅण्ड व्हाईटच दिसत होती. ‘आरसीए’चे म्हणणे असे होते की, ब्लॅक अॅण्ड व्हाईट टिव्ही बघणाऱ्यांना लोकांना हे कळावे की, ते काय-काय मिस करीत आहेत. म्हणून त्यांनी एवढा कलरफुल लोगो तयार केला.

4) _*ऑडी*_ : 1932 साली ऑगस्ट हॉर्च यांनी जर्मनीमध्ये या कंपनीची स्थापना केली. जगभरात प्रसिद्ध असलेल्या गाड्यांची ही आणखी एक कंपनी ऑडी आहे. या कंपनीच्या गाड्या भारतातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. अगदी साधा आणि सरळ या कंपनीचा लोगो दिसतो. पण याचा अर्थ लगेच कुणाच्या लक्षात येत नाही. चार गोलांची साखळी या लोगोमध्ये दाखवण्यात आली आहे. हे चार गोल ‘ऑटो युनियन कॉन्सोर्टियम’ मधील चार संस्थापक कंपनीचे आहेत. त्यात ‘डिडब्ल्यूके’, ‘हॉर्च’, ‘वंडरर’ आणि ‘ऑडी’ यांचा समावेश आहे.

5) _*वोल्क्सवॅगन*_ : व्होल्क्सवॅगन ही एक जर्मन कंपनी आहे. या कंपनीची सुरूवात 1937 साली जर्मनी येथून झाली आहे. या कंपनीच्या लोगोमध्ये ‘V’ आणि ‘W’ हे दोन शब्द प्रखरपणे दिसतात. यातील ‘V’चा अर्थ आहे ‘वोल्क्स’ म्हणजेच लोक, जर्मनीतील लोक आणि ‘W’ चा अर्थ आहे वॅगन म्हणजेच कार. एकुणच काय तर लोकांसाठीची कार असा या लोगोचा अर्थ आहे.

6) _*अॅमेझॉन*_ : ऑनलाईन खरेदीच्या अॅमेझॉन ही एक अग्रगण्य वेबसाईट आहे. या कंपनीची सुरूवात फक्त पुस्तकांची ऑनलाईन विक्री करण्यापासून झाली होती. जेफ बेझोस यांनी 1994 साली ही वेबसाईट सुरू केली. जर का आपण या साईटचा लोगो निरीक्षण करून पाहिला तर आपल्याला अॅमेझॉन या शब्दाखाली एक अॅरो दिसतो. हा अॅरो एका स्माईली सारखाही भासतो. त्यावरून असे वाटते की, अॅमेझॉन आपल्या ग्राहकांना आनंदी ठेवतात असा एक अर्थ निघतो. पण असा याचा अर्थ नसून हाच अॅरो आणखी निरीक्षण करून पाहिला तर तो अॅमेझॉन शब्दातील ‘A’ पासून सुरू होऊन ‘Z’ या शब्दावर रोखण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, अॅमेझॉन या कंपनीकडे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ‘A’ ते ‘z’ वस्तू आहेत.

अशाच प्रकारचे अपडेट्स साठी Rocking Funs  ला भरपूर प्रतिसाद द्या share करा।

मोबाइलला छुप्या युक्या

अॅण्ड्रॉइडवरच्या छुप्या युक्त्या




1. अॅण्ड्रॉइडवरील ‘स्मार्ट लॉक’
आपला फोन कुणाच्याही हातात पडला तरी त्याला तो पाहता येऊ नये, यासाठी स्मार्टफोनवर ‘लॉक’ची सुविधा देण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा आपल्याला अनेकदा त्रासही होतो. विशेषत: घाईगडबडीच्या वेळी आपल्याला फोनचा ‘पॅटर्न लॉक’ काढण्यासाठी खर्च होणारा वेळही युगासमान वाटतो. अशा वेळी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये ‘स्मार्ट लॉक’ची सुविधा कार्यान्वित करू शकता.
ही सुविधा सुरू करण्यासाठी स्मार्टफोनच्या ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘सिक्युरिटी’वर क्लिक करा. तेथे ‘स्मार्ट लॉक’ची सुविधा दिसेल. त्यामध्ये तुम्हाला विविध पर्याय दिसतील. यात तुमचा फोन कुठे लॉक असला पाहिजे, कुठे तुम्ही केवळ ‘स्वाइप’ने फोन अनलॉक करू शकता, अशा पर्यायांचा समावेश आहे.

2. ‘सायलंट’ फोनची शोधाशोध
आपला फोन आपण कुठे तरी ठेवून विसरतो आणि मग कुणाला तरी ‘रिंग द्यायला’ विनवणी करावी लागते. रिंग वाजल्यामुळे फोन सापडतो. पण अशा प्रसंगी फोन ‘सायलेंट मोड’मध्ये असेल तर..? फोन ‘सायलेंट’ असेल तर कितीही कॉल करून तुम्हाला त्याचा शोध लागणार नाही. अशा वेळी ही युक्ती वापरून बघा.
तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपच्या इंटरनेट ब्राऊजरवर जाऊन http:android.com/devicemanager ही लिंक खुली करा. त्यावरील लॉग इन स्क्रीनमध्ये तुमच्या फोनवरील ‘जी मेल’ आयडी आणि पासवर्ड टाका. त्यानंतर दिसणाऱ्या पेजच्या मदतीने तुम्ही तुमचा हरवलेला फोन लगेच शोधू शकता. अगदी फोन सायलेंट असेल तरी या सुविधेच्या माध्यमातून तो मोठमोठय़ाने रिंग होतो.

3. ‘डेव्हलपर’ व्हा!
तुमच्या अॅण्ड्रॉइड फोनवरील अंतर्गत किंवा पडद्यामागील घडामोडींवर बऱ्यापैकी नियंत्रण आणायचं असेल तर तुम्हाला तुमच्या फोनचा ‘डेव्हलपर’ झालं पाहिजे. यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज नाही. तुमच्या मोबाइलच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘अबाऊट फोन’वर क्लिक करा. त्या स्क्रीनवर तुमच्या मोबाइलचा ‘बिल्ड नंबर’ अर्थात आवृत्ती दिसेल. त्या पर्यायावर पाच ते सात वेळा क्लिक करा. तुम्हाला ‘यू आर अ डेव्हलपर’ असा संदेश पाहायला मिळेल. याचा अर्थ आता तुम्ही तुमच्या मोबाइलच्या अंतर्गत यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही नियंत्रण आणू शकता.
डेव्हलपर होण्याचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या फोनचा स्पीड वाढवू शकता. बऱ्याचदा दोन अॅप्समध्ये जाताना किंवा ‘स्क्रीन’ पुढे सरकवताना आपला फोन काहीसा मंदावल्यासारखा वाटतो. अशा वेळी सेटिंगमध्ये जाऊन ‘डेव्हलपर्स ऑप्शन’ हा पर्याय निवडा. त्यामध्ये ‘अॅनिमेशन स्केल’चा पर्याय दिसेल. ‘अॅनिमेशन स्केल’ कमी केल्यावर तुम्हाला तुमच्या फोनच्या वेगात सुधारणा झाल्याचे दिसेल.

4. आयफोनवर मोबाइल डेटाची बचत
मोबाइलवरील इंटरनेट डाटा दिवसेंदिवस महाग होत चालल्याने आपण त्याचा वापर अतिशय काळजीपूर्वक करत असतो. मात्र अनेक अॅप्स असे असतात, जे त्यांचा वापर न करतादेखील इंटरनेट डाटा वापरत असतात. त्यामुळे आपला डाटा आणि पैसा खर्च होतो. अशा अॅप्सवर नियंत्रण आणण्याची सुविधा ‘आयओएस’वर आधारित फोनमध्ये अर्थात आयफोनमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी फोनच्या ‘सेटिंग’मध्ये जाऊन ‘ऑथराइज टू यूज डाटा’ हा पर्याय रद्द करा (अनसिलेक्ट करा).
कोणत्या अॅप्सना इंटरनेट वापरण्याची परवानगी द्यायची, हेदेखील तुम्ही ठरवू शकता. त्यासाठी सेटिंगमध्ये सुविधा उपलब्ध असून त्यात तुम्ही डेटाखाऊ अॅप्सना केवळ ‘वायफाय’मध्ये चालण्याची मर्यादा घालू शकता.

राग काटकसरीने कसा वापराल?

*रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?* प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे,...