Showing posts with label #rockingfuns #group#channel#subscribed. Show all posts
Showing posts with label #rockingfuns #group#channel#subscribed. Show all posts

दिवाळीची साफसफाई करताना या गोष्टी लक्षात ठेवा

🎆 _*दिवाळीची साफसफाई करताना या गोष्टी लक्षात ठेवा !*_

🎇 _काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपली आहे. सगळ्यांच्या घरात साफसफाई सुरु झाली असेलच. पण त्या आधी या काही गोष्टी लक्षात ठेवा, या नक्कीच तुम्हाला मदतीला येतील !_

▪ घरातील न लागणाऱ्या वस्तू माळ्यावर साठवून न ठेवता लागत नसतील तर त्या टाकून द्या.

▪ घरातील कपाटामागील किंवा इतर वस्तूंमागील धूळ आधी झाडूने साफ करा. मगच ओल्या फडक्याने पुसून घ्या. कोरड्याने धूळ साफ केल्यामुळे पाण्याने साफ करताना जास्त खराब होत नाही.

▪ ज्यांना धुळीचा त्रास होतो त्यांनी नाकाला रुमाल बांधून मगच साफसफाईचे काम करण्यास सुरुवात करा. धुळीची अॅलर्जी असल्यास त्रास होण्याची शक्यता असते.

▪ घरातील पडदे जास्त वेळा धुतले जात नाहीत. मात्र दिवाळीच्या वेळी हे धुवायला काढताना जास्त काळ साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यामुळे त्यामधील मळ लवकर निघतो.

▪ स्वयंपाकघर किंवा बाथरुममधल्या टाइल्स साफ करताना चांगल्या दर्जाच्या फिनाईलचा वापर करावा. त्यामुळे या टाइल्स चमकण्यास मदत होते.

▪ घरातील सर्व व्यक्तींनी साफसफाईच्या कामात सहभाग घ्यावा. अन्यथा घरातील स्त्री एकटीच ही कामे करताना दमून जाते. घरातील लहान मुलांनाही त्यांना शक्य त्या प्रकारची कामे सांगावीत. जेणेकरुन त्यांनाही लहानपणापासूनच साफसफाई करण्याची सवय लागते.

▪ घरातील लोकांना ऑफीस आणि इतर व्यापामुळे साफसफाई करणे शक्य नसल्यास बाहेरच्या लोकांकडून साफसफाई करुन घेण्यात येते. मात्र बाहेरुन लोकांना बोलावताना ती आपल्या किमान ओळखीची असतील याची काळजी घ्यायला हवी. घरातील किमती चीजवस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवायला हव्यात.

▪ स्वयंपाकघरातील सिंक किंवा यासारखी एखादी बंद जागा असेल तर त्याठिकाणी कुबटपणा राहण्याची शक्यता असते. अशावेळी तिथे डांबरगोळ्या किंवा कापूर ठेवावा. त्यामुळे कुबटपणा निघून जाण्यास मदत होतेच, शिवाय किडे, मुंग्या, झुरळे यांचा प्रादुर्भाव होत नाही.

#माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा रॉकिंग फन्स डिजिटल मॅगझीन, त्यासाठी क्लिक करा*_ 👉

सेल्फीचा शोध कधी लागला

👉 _*सेल्फीचा शोध कधी लागला?*

कळत-नकळत ’सेल्फी’ आता आपला आयुष्याचा भाग बनलाय. आयुष्यातले अनेक क्षण सेल्फीतून साठवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? या सेल्फीचा शोध हा काही नवा नाही. तर संग्रहणांमधील माहितीनुसार सेल्फी नवीन नसून 100 वर्षांपूर्वीच त्याचा शोध लावल्याचे समोर आले आहे.

सर्वात जुना आणि पहिला सेल्फी 1839 मध्ये रॉबर्ट कॉर्नेलुइस यांनी काढला होता. त्या काळातील तंत्रज्ञानानुसार कमीत कमी 15 मिनिटं ते एकाच ठिकाणी एकाच पोजमध्ये उभे राहीले असणार. 1914 मध्ये रशियातील अनास्तासियाने तेराव्या वर्षी सेल्फी काढला होता. आपल्या वडीलांना दिलेल्या पत्रामध्ये ‘मी आरशात पाहून स्वत: चा फोटो काढला, पण हे खूप कठीण होते कारण फोटो काढताना माझे हात थरथरत होते’ असं तिने लिहीले आहे.

न्यूयॉर्कच्या जोसेफ बायरोनने 1920 मध्ये आपल्या मित्रांसह छतावर पहिला ग्रुप सेल्फी काढला होता. त्यावेळी कॅमेरा इतका मोठा आणि जबरदस्त होता की, तो कॅमेरा हाताळण्यासाठी दोन वेगळ्या व्यक्ती होत्या. 1966 मध्ये ताजमहलसमोर एका 23 वर्षीय तरुणाने सेल्फी काढला होता. मानवानंतर प्राणीदेखील सेल्फी घेण्यात मागे राहीले नाहीत.

2011 मध्ये, कॅमरामॅन डेव्हिड स्लैटरच्या कॅमेऱ्यातून एका ब्लॅक मकाऊने सेल्फी काढला होता. या फोटोच्या मालकीवरील वाद न्यायालयात पोहोचला होता. 2013 मध्ये सेल्फी हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून समाविष्ट करण्यात आला होता. 2014 मध्ये हॉलिवुड स्टारचा ग्रुप सेल्फी सर्वात जास्त शेअर केला गेला.

अशाप्रकाची माहिती मिळवण्यासाठी Rocking Funs Channels ला subscribed करा

राग काटकसरीने कसा वापराल?

*रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?* प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे,...