राग काटकसरीने कसा वापराल?



*रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?*

प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत करु शकता का?
, सर्वप्रथम आपले मनःपुर्वक अभिनंदन, कारण तुम्ही हे मान्य केलेत, आणि तुम्ही आयुष्यात नवे सकारात्मक बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात, सज्ज आहात, त्यामुळे अर्धा विजय तर इथेच झाला.

मी चुकतोय, हे कळणे, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणे; नाही का?

आता तुमच्या प्रश्नाकडे वळुया, मी तर म्हणेन, दाग अच्छे है, च्या धर्तीवर राग चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल.

उदा. आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणुन तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरीबीचा तिटकारा असतो म्हणुन आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणुन तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो!

*राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात.*

मार्टीन ल्युथर किंगला राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलुन टाकली.

नेल्सन मंडेलाला कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली.

आंबेडकरांनी तेच केलं, शिवाजी महाराजांनी केलं, त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवुन शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातुन मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपुर्तीसाठी वापरलं!..

ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की!

*फालतु गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमुल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.*

जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही टिप्स देत आहे.

१) *स्वीकार करा.*
समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खुप महत्वाचं काम करत आहात, आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल, म्हणुन ‘लाईट गेली’, याचा स्वीकार करा, आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यात रमामाण व्हा!, त्याचा आनंद घ्या!

असचं समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन कर्कश हॉर्न वाजवुन, आजुबाजुच्यांशी भांडुन काय साध्य होणारे? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा, आणि आनंद घ्या!

२) *स्वतःला दररोज सुधारा. सिद्ध करा.*
कोणी तुमची चुक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात पण त्यातुन कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा.

३) *चुप्प बसा. विसरा.*
कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणुन अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते.

आईवडील, भाऊ बहीण, बायकोमुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेचं लोक हरलेले असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात.

अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा?

म्हणुन काही ठिकाणी गप्प राहणं, तिथुन निघुन जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं!

४) *आभार मानुन आनंदी व्हा!*
ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवुन त्याचे आभार माना. राग पळुन जाईल.

५) *हसा!*
कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहुन हसा, विनोद बनवा, खळखळुन हसा, मजा घ्या, दुःखाची तीव्रता नाहीशी होईल!

( *जर वरील गोष्टी आत्मसात नाही केलात तर हाच राग कदाचित लकवा आणू शकतो,त्याच बरोबर रक्तदाब ,मधुमेह,संधिवात, दमा, निद्रानाश व डिप्रेशन देखील आणू शकतो...ठरवा रागाचा वापर कशासाठी करायचा*)

येणार्‍या प्रत्येक दिवशी तुमची उर्जा तुमची शक्ति बनावी, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपल्यापैकी बऱ्याचजणांना हे जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते की, आपल्याबाबत इतरांचं म्हणणं काय आहे? किंवा आपल्या स्वभावाबाबत समोरची व्यक्ती नक्की काय विचार करते?

आपल्यापैकी बऱ्याचजणांना हे जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते की, आपल्याबाबत इतरांचं म्हणणं काय आहे? किंवा आपल्या स्वभावाबाबत समोरची व्यक्ती नक्की काय विचार करते? असं सांगितलं जातं की, पुरूषांपेक्षा जास्त महिलांना याबाबत उत्सुकता असते. त्या नेहमी आपल्याबाबत आपला लाइफपार्टनर काय विचार करतो, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या अशा काही गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्या फक्त लाइफ पार्टनरचंच नाहीतर प्रत्येकाचंच मन जिंकण्यासाठी फायदेशीर ठरतात.

समजुतदार मुली

         प्रत्येक पुरूषाला त्याची लाइफ पार्टनर समजुतदार असावी असं वाटतं. जेणेकरून त्या त्यांना समजुन घेतील. त्यांचं म्हणणं ऐकून योग्य निर्णय घेण्यास त्यांची साथ देतील. एवढचं नाहीतर त्या स्वतः विचारी असाव्यात जेणेकरून एखादी निर्णयात्मक परिस्थिती ओढावली तर त्या ती व्यवस्थित हॅन्डल करू शकतील.

मनमोकळ्या आणि स्पष्टवक्त्या
 
               नेहमी आनंदी राहणाऱ्या आणि स्वभावाने मनमोकळ्या असणाऱ्या मुली प्रत्येक मुलाला आवडतात. काही मुलांचा स्वभाव मिश्किल असतो. त्यामुळे त्यांना मिश्किल स्वभावाच्या मुली आवडतात. तसेच त्यांना अशा मुली आवडतात, ज्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तम असतं.

इमानदार मुली

             मुलांना कधीही फार फिरवून गोष्टी सांगणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत. त्यांना इमानदार आणि थेट बोलणाऱ्या मुली फार आवडतात. अशा मुली आपल्या कामामध्ये आणि कुटुंबियांकडे लक्ष देण्यात कितीही व्यस्त असल्या तरिही आपल्या नात्यासाठी थोडातरी वेळ नक्की काढतात.

आत्मविश्वास असतो भरपूर

               पुरषांना नेहमी त्याच महिला आवडतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असतोच, पण त्या सकारात्मकही असतात. अशा महिला कोणत्याही परिस्थितीमध्ये न घाबरता निर्णय घेतात.

केअरिंग आणि सिम्पल

                परूषांना मुलींमध्ये प्रत्येक गोष्टींसोबतच त्यांचं केअरिंग नेचरही आवडतं. एवढचं नाहीतर त्यांना सिंम्पल नेचर असणाऱ्या मुलीही फार आवडतात.

उत्तम जेवण बनवणारी

           जास्तीत जास्त पुरूषांना उत्तम जेवण तयार करणाऱ्या महिला फार आवडतात. कारण असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीच्या हृदयापर्यंतचा रस्ता हा त्याच्या पोटातून जातो. नेहमी पुरूष त्यांच महिलांची निवड करतात. ज्या जेवण तयार करण्यात अगदी सुगरण असतात. 

राग काटकसरीने कसा वापराल?

*रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?* प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे,...