_*Rocking Funs
ढेकर येणं हा पचनक्रियेचा एक भाग आहे. अनेक वेळा आपला असा समज असतो कि, ढेकर आला म्हणजे पोटभर जेवण झालं किंवा जेवण चांगलं झालं. मात्र ढेकर येण्याचे वेगवेगळे कारणे आहेत. म्हणूनच ढेकर येण्याची नेमके काय कारणे आहेत त्याविषयी जाणून घेऊयात...
------------------------
YouTube वर विडिओ पाहण्यासाठी Rocking Funs Video Channels ला Subscribe करा आणि Like करा.
------------------------
👉 खाण्यावेळी जांभया देताना मोठे तोंड उघडले तर जास्तप्रमाणात हवा शरीरात जाते. जास्त हवा गेल्याने सारखे-सारखे ढेकर येऊ शकतात.
👉 पचनक्रियेवर परिणाम झाल्याने बद्धकोष्ठता किंवा अपचन होते. यामुळे पोटात गॅस निर्माण होऊन ढेकर येतात. पचनक्रियेच्या मदतीसाठी पोटात जीवाणू असतात. त्यांच्यात काही बिघाड झाल्यानेसुद्धा ढेकर येतात.
👉 काहीजण लवकर-लवकर, मोठे-मोठे घास खातात. मोठे-मोठे घास घेतल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो आणि जास्त ढेकर येतात.
👉 उपाशी असल्यामुळे पोटात बाहेरची हवा जमा होते. जमलेली हवा ढेकरच्या रुपात शरीराबाहेर फेकली जाते.
👉 कार्बोनेटयुक्त पेये, जंक फूड, कोबी, मटार, डाळी या सारख्या पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. हे पदार्थ खाल्ल्यावर जास्त ढेकर येतात.
👉 धुम्रपान केल्याने सिगारेटच्या धुराबरोबर बाहेरची हवासुद्धा शरीरात जाते. ही हवा ढेकरद्वारे बाहेर फेकली जाते.
👉 हिरड्यांमध्ये योग्यरीत्या दात बसवले नाही तर त्यात फट निर्माण होते. काही खाताना-पिताना हवा शरीरात जाते. यामुळे सारखे-सारखे ढेकर येऊ शकतात.
👉 काही वेळा ताण-तणाव असल्यामुळे काहीजण अाहाराचे अतिसेवन करतात. ज्यामुळे पचनक्रियेवर परीणाम होतो आणि पचनक्रिया मंदावते. हे देखील सारखं-सारखं ढेकर येण्याचं कारण बनते.
Rocking Funs....