राग काटकसरीने कसा वापराल?



*रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?*

प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत करु शकता का?
, सर्वप्रथम आपले मनःपुर्वक अभिनंदन, कारण तुम्ही हे मान्य केलेत, आणि तुम्ही आयुष्यात नवे सकारात्मक बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात, सज्ज आहात, त्यामुळे अर्धा विजय तर इथेच झाला.

मी चुकतोय, हे कळणे, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणे; नाही का?

आता तुमच्या प्रश्नाकडे वळुया, मी तर म्हणेन, दाग अच्छे है, च्या धर्तीवर राग चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल.

उदा. आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणुन तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरीबीचा तिटकारा असतो म्हणुन आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणुन तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो!

*राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात.*

मार्टीन ल्युथर किंगला राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलुन टाकली.

नेल्सन मंडेलाला कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली.

आंबेडकरांनी तेच केलं, शिवाजी महाराजांनी केलं, त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवुन शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातुन मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपुर्तीसाठी वापरलं!..

ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की!

*फालतु गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमुल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.*

जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही टिप्स देत आहे.

१) *स्वीकार करा.*
समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खुप महत्वाचं काम करत आहात, आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल, म्हणुन ‘लाईट गेली’, याचा स्वीकार करा, आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यात रमामाण व्हा!, त्याचा आनंद घ्या!

असचं समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन कर्कश हॉर्न वाजवुन, आजुबाजुच्यांशी भांडुन काय साध्य होणारे? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा, आणि आनंद घ्या!

२) *स्वतःला दररोज सुधारा. सिद्ध करा.*
कोणी तुमची चुक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात पण त्यातुन कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा.

३) *चुप्प बसा. विसरा.*
कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते. म्हणुन अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते.

आईवडील, भाऊ बहीण, बायकोमुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेचं लोक हरलेले असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात.

अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा?

म्हणुन काही ठिकाणी गप्प राहणं, तिथुन निघुन जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं!

४) *आभार मानुन आनंदी व्हा!*
ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवुन त्याचे आभार माना. राग पळुन जाईल.

५) *हसा!*
कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहुन हसा, विनोद बनवा, खळखळुन हसा, मजा घ्या, दुःखाची तीव्रता नाहीशी होईल!

( *जर वरील गोष्टी आत्मसात नाही केलात तर हाच राग कदाचित लकवा आणू शकतो,त्याच बरोबर रक्तदाब ,मधुमेह,संधिवात, दमा, निद्रानाश व डिप्रेशन देखील आणू शकतो...ठरवा रागाचा वापर कशासाठी करायचा*)

येणार्‍या प्रत्येक दिवशी तुमची उर्जा तुमची शक्ति बनावी, अशा मनःपुर्वक शुभेच्छा!.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपल्यापैकी बऱ्याचजणांना हे जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते की, आपल्याबाबत इतरांचं म्हणणं काय आहे? किंवा आपल्या स्वभावाबाबत समोरची व्यक्ती नक्की काय विचार करते?

आपल्यापैकी बऱ्याचजणांना हे जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते की, आपल्याबाबत इतरांचं म्हणणं काय आहे? किंवा आपल्या स्वभावाबाबत समोरची व्यक्ती नक्की काय विचार करते? असं सांगितलं जातं की, पुरूषांपेक्षा जास्त महिलांना याबाबत उत्सुकता असते. त्या नेहमी आपल्याबाबत आपला लाइफपार्टनर काय विचार करतो, हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या अशा काही गोष्टींबाबत सांगणार आहोत. ज्या फक्त लाइफ पार्टनरचंच नाहीतर प्रत्येकाचंच मन जिंकण्यासाठी फायदेशीर ठरतात.

समजुतदार मुली

         प्रत्येक पुरूषाला त्याची लाइफ पार्टनर समजुतदार असावी असं वाटतं. जेणेकरून त्या त्यांना समजुन घेतील. त्यांचं म्हणणं ऐकून योग्य निर्णय घेण्यास त्यांची साथ देतील. एवढचं नाहीतर त्या स्वतः विचारी असाव्यात जेणेकरून एखादी निर्णयात्मक परिस्थिती ओढावली तर त्या ती व्यवस्थित हॅन्डल करू शकतील.

मनमोकळ्या आणि स्पष्टवक्त्या
 
               नेहमी आनंदी राहणाऱ्या आणि स्वभावाने मनमोकळ्या असणाऱ्या मुली प्रत्येक मुलाला आवडतात. काही मुलांचा स्वभाव मिश्किल असतो. त्यामुळे त्यांना मिश्किल स्वभावाच्या मुली आवडतात. तसेच त्यांना अशा मुली आवडतात, ज्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तम असतं.

इमानदार मुली

             मुलांना कधीही फार फिरवून गोष्टी सांगणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत. त्यांना इमानदार आणि थेट बोलणाऱ्या मुली फार आवडतात. अशा मुली आपल्या कामामध्ये आणि कुटुंबियांकडे लक्ष देण्यात कितीही व्यस्त असल्या तरिही आपल्या नात्यासाठी थोडातरी वेळ नक्की काढतात.

आत्मविश्वास असतो भरपूर

               पुरषांना नेहमी त्याच महिला आवडतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास भरपूर असतोच, पण त्या सकारात्मकही असतात. अशा महिला कोणत्याही परिस्थितीमध्ये न घाबरता निर्णय घेतात.

केअरिंग आणि सिम्पल

                परूषांना मुलींमध्ये प्रत्येक गोष्टींसोबतच त्यांचं केअरिंग नेचरही आवडतं. एवढचं नाहीतर त्यांना सिंम्पल नेचर असणाऱ्या मुलीही फार आवडतात.

उत्तम जेवण बनवणारी

           जास्तीत जास्त पुरूषांना उत्तम जेवण तयार करणाऱ्या महिला फार आवडतात. कारण असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीच्या हृदयापर्यंतचा रस्ता हा त्याच्या पोटातून जातो. नेहमी पुरूष त्यांच महिलांची निवड करतात. ज्या जेवण तयार करण्यात अगदी सुगरण असतात. 

दिवाळीची साफसफाई करताना या गोष्टी लक्षात ठेवा

🎆 _*दिवाळीची साफसफाई करताना या गोष्टी लक्षात ठेवा !*_

🎇 _काही दिवसांवरच दिवाळी येऊन ठेपली आहे. सगळ्यांच्या घरात साफसफाई सुरु झाली असेलच. पण त्या आधी या काही गोष्टी लक्षात ठेवा, या नक्कीच तुम्हाला मदतीला येतील !_

▪ घरातील न लागणाऱ्या वस्तू माळ्यावर साठवून न ठेवता लागत नसतील तर त्या टाकून द्या.

▪ घरातील कपाटामागील किंवा इतर वस्तूंमागील धूळ आधी झाडूने साफ करा. मगच ओल्या फडक्याने पुसून घ्या. कोरड्याने धूळ साफ केल्यामुळे पाण्याने साफ करताना जास्त खराब होत नाही.

▪ ज्यांना धुळीचा त्रास होतो त्यांनी नाकाला रुमाल बांधून मगच साफसफाईचे काम करण्यास सुरुवात करा. धुळीची अॅलर्जी असल्यास त्रास होण्याची शक्यता असते.

▪ घरातील पडदे जास्त वेळा धुतले जात नाहीत. मात्र दिवाळीच्या वेळी हे धुवायला काढताना जास्त काळ साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवावेत. त्यामुळे त्यामधील मळ लवकर निघतो.

▪ स्वयंपाकघर किंवा बाथरुममधल्या टाइल्स साफ करताना चांगल्या दर्जाच्या फिनाईलचा वापर करावा. त्यामुळे या टाइल्स चमकण्यास मदत होते.

▪ घरातील सर्व व्यक्तींनी साफसफाईच्या कामात सहभाग घ्यावा. अन्यथा घरातील स्त्री एकटीच ही कामे करताना दमून जाते. घरातील लहान मुलांनाही त्यांना शक्य त्या प्रकारची कामे सांगावीत. जेणेकरुन त्यांनाही लहानपणापासूनच साफसफाई करण्याची सवय लागते.

▪ घरातील लोकांना ऑफीस आणि इतर व्यापामुळे साफसफाई करणे शक्य नसल्यास बाहेरच्या लोकांकडून साफसफाई करुन घेण्यात येते. मात्र बाहेरुन लोकांना बोलावताना ती आपल्या किमान ओळखीची असतील याची काळजी घ्यायला हवी. घरातील किमती चीजवस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवायला हव्यात.

▪ स्वयंपाकघरातील सिंक किंवा यासारखी एखादी बंद जागा असेल तर त्याठिकाणी कुबटपणा राहण्याची शक्यता असते. अशावेळी तिथे डांबरगोळ्या किंवा कापूर ठेवावा. त्यामुळे कुबटपणा निघून जाण्यास मदत होतेच, शिवाय किडे, मुंग्या, झुरळे यांचा प्रादुर्भाव होत नाही.

#माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर, त्यासाठी जॉईन करा रॉकिंग फन्स डिजिटल मॅगझीन, त्यासाठी क्लिक करा*_ 👉

कोजागिरी विशेष महत्त्व

कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)
March 23, 2013
कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो. या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजाविधी या लेखातून समजून घेऊया.

१. तिथी

कोजागरी पौर्णिमा हा उत्सव आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरा करतात.

२. इतिहास

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने व्रजमंडळात रासोत्सव साजरा केला, असे श्रीमद्भागवतात म्हटले आहे.

३. महत्त्व

अ. वर्षातील या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ असतो आणि त्यामुळे तो मोठा दिसतो. मूळ चंद्रतत्त्वाचे म्हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्व करणारा आणि आपल्याला दिसणारा चंद्र ‘चंद्रमा’प्रमाणेच शीतल आणि आल्हाददायक आहे. साधकांना चंद्रासारखी शीतलता ईश्वराच्या अवतारांपासून अनुभवता येते, म्हणूनच रामचंद्र, कृष्णचंद्र अशीही नावे राम-कृष्णांना दिली गेली. चंद्राच्या या गुणांमुळेच ‘नक्षत्राणामहं शशी’ म्हणजे ‘नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत (१०:२१) सांगितले आहे.

आ. मध्यरात्री श्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येऊन ‘को जागर्ति’ म्हणजे ‘कोण जागे आहे ?’, असे विचारून जो जागा असेल, त्याला धनधान्याने संतुष्ट करते.

इ. या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्तीरूपी धारणेतील श्री लक्ष्मीरूपी इच्छाशक्तीची स्पंदने कार्यरत असतात. या दिवशी धनसंचयाविषयी असलेल्या सकाम विचारधारणा पूर्णत्वाला जातात. या धारणेच्या स्पर्शाने स्थूलदेह, तसेच मनोदेह यांची शुद्धी होण्यास साहाय्य होऊन मनाला प्रसन्नधारणा प्राप्त होते. या दिवशी कार्याला विशेष असे धनसंचयात्मक कार्यकारी बल प्राप्त होते.

ई. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.

उ. कोजागरी पौर्णिमेला वातावरणात प्रक्षेपित होणार्‍या लहरी

लहरी

प्रमाण (प्रतिशत)

भाव २५
चैतन्य २०
आनंद ३०
शांती २५
एकूण १००

४. भावार्थ

कोजागरीच्या रात्री जो जागृत आणि सावध असतो, त्यालाच अमृतप्राशनाचा लाभ मिळतो ! कोजागर · को ± ओज ± आगर. या दिवशी चंद्राच्या किरणांद्वारे सर्वांना आत्मशक्तीरूपी (ओज) आनंद, आत्मानंद, ब्रह्मानंद भरभरून मिळतो; परंतु हे अमृत प्राशन करण्यासाठी ऋषी म्हणतात, ‘को जागर्ति ?, म्हणजे कोण जागृत आहे ? कोण सावध आहे ? कोण याचे माहात्म्य जाणतो ? जो जागृत आणि सावध आहे आणि ज्याला याचे माहात्म्य ठाऊक आहे, त्यालाच या अमृतप्राशनाचा लाभ मिळेल !’ – प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

५. उत्सव साजरा करण्याची पद्धत

‘या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात आणि मग आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. या रात्री जागरण करतात. करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसर्‍या दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.

६. कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी
लक्ष्मी आणि इंद्र यांचे पूजन करण्याची कारणे

अ. या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो.

आ. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते.

७. लक्ष्मी आणि इंद्र यांचा पूजाविधी

अ. लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात. पोहे हे आनंद देणारे, तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे. त्यामुळे हे दोन घटक वापरून जीव स्वतःकडे आनंद आणि शीतलता यांच्या लहरी आकर्षित करत असतो.

आ. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात; कारण या दिवशी दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहिल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे चंद्रतत्त्व आपल्याला मिळते. या दुधात स्थूल आणि सूक्ष्म रूपांतून चंद्राचे रूप अन् तत्त्व आकर्षित झालेले असते.

इ. जागरण : मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते. त्यामुळे कोजागरीच्या रात्री जागरण केले जाते.

अधिक माहितीसाठी ROCKING FUNS ला भेट द्या।।

अवयव दान करणारे कायकर्त

स्वतःसाठी जगतो. मी स्वतःची किडनी (मूत्रपिंड) लष्करी जवानाला दान केली. असे करताना मला आनंद मिळाला. कारण मी एखाद्याच्या उपयोगी पडलो होतो. अवयव दान हे पुण्यकर्मच होय. म्हणून तर मी "भारत ऑर्गन यात्रे'ला निघालो आहे.'' मूळचे ढवळी (ता. वाळवा, जि. सांगली) गावचे शेतकरी प्रमोद महाजन यांनी हे मत व्यक्त केले असून, ते शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहेत. 

पुणे - ""प्राणी दुसऱ्यांसाठी जगतात. मात्र, माणूस स्वतःसाठी जगतो. मी स्वतःची किडनी (मूत्रपिंड) लष्करी जवानाला दान केली. असे करताना मला आनंद मिळाला. कारण मी एखाद्याच्या उपयोगी पडलो होतो. अवयव दान हे पुण्यकर्मच होय. म्हणून तर मी "भारत ऑर्गन यात्रे'ला निघालो आहे.'' मूळचे ढवळी (ता. वाळवा, जि. सांगली) गावचे शेतकरी प्रमोद महाजन यांनी हे मत व्यक्त केले असून, ते शंभर दिवसांच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाला निघाले आहे.

शनिवारवाडा येथून (ता.21 रविवारी ) महाजन यांनी प्रवासाला सुरवात केली. एकूण 18 राज्यांत फिरून ते अवयव दानाविषयी जनजागृती करणार आहेत. एड्‌स विषयी जनजागृती असो, की नातीच्या जन्माचे स्वागत म्हणून निराधार महिलांना स्वखर्चाने साड्यांचे वाटप असो, 67 वर्षीय महाजन नेहमी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने कार्यरत असतात. रिबर्थ फाउंडेशनने महाजन यांची दुचाकी मोहीम आयोजिली आहे. मोहन फाउंडेशन, झेडटीसीसी, बीव्हीजी, जीवनसार्थकी, रोटोसोटो, डोनेटलाईफ, मायलेज मंचर्स या स्वयंसेवी संस्थांनी देखील या मोहिमेला पाठिंबा दर्शविला आहे. महाजन यांना शुभेच्छा देण्यासाठी या संस्थांचे स्वयंसेवक तसेच त्यांच्या पत्नी सुशीला आणि मुलगी चैताली उपस्थित होत्या. नगरसेविका गायत्री खडके यांनी झेंडा फडकावून या मोहिमेला शुभेच्छा दिल्या. 

अवयवदानातून अनेकांना जीवदान मिळू शकतो. आयुर्मान वाढू शकते. म्हणूनच अवयवदानाविषयी प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाजन भारत भ्रमंती करणार आहेत. खडके म्हणाल्या, ""अवयवदान केल्याने गरजू व्यक्तीला एकप्रकारे पुनर्जन्म मिळाल्याचे समाधान मिळेल. कदाचित कुटुंबातील व्यक्तीलाही जीवदान मिळू शकेल. म्हणून अवयवदानाबद्दल अधिकाधिक जनजागृती होणे गरजेचे आहे'' 

""मी अवयव दान केले आहे. स्वतः केल्यावर आता या विषयी जनजागृती करतोय. जनतेने सेवेची संधी द्यावी. मनोधैर्य आणि मानसिक पाठबळ असले की, कार्य घडते. याच अनुषंगाने मी जनजागृतीच्या तयारीला लागलो.'' 
- प्रमोद महाजन, अवयवदानासाठी चळवळ करणारे कार्यकर्ते 

अधिक माहितीसाठी ROCKING FUNS PAGE ला LIKE अँड SUBCRIBE करा

ROCKING FUNS GRAFFICS
       Social Media Advertising
                              

चेक आऊट

Check out @wakchaure_kiran’s Tweet: https://twitter.com/wakchaure_kiran/status/1051002979891830784?s=09

तुमचा पत्ताही होणार आता डिजिटल

👉 _*तुमचा पत्ताही होणार आता डिजिटल

तुमच्या घराचा पत्ता लांबलचक सांगण्यापेक्षा काही अंकात सांगता आला तर? सगळं कसं स्वप्नवत वाटतं ना? थांबा, आता खरंच तुमच्या पत्त्याची जागा काही डिजिटल अंक घेणार आहेत. या अंकातून तुम्ही कोणत्या शहरात, एरिया, कोणता रस्ता, घर क्रमांक काय? आदी माहिती लगेच उपलब्ध होणार आहे. यासाठी मोदी सरकार मॅप माय इंडिया कंपनी दूरसंचार मंत्रालयासोबत मिळून एक पायलट प्रोजेक्ट तयार करत आहे. याला पोस्ट विभागाच्या माध्यमातून राबविले जाणार आहे.

_*कसा असेल डिजिटल पत्ता?*_

सरकारच्या या नवीन योजनेअंतर्गत तुमच्या पत्त्याच्या जागी सहा आकडी क्रमांक दिला जाणार आहे. या कोडचे नाव ईलॉक असे असेल. याचा फायदा हा असेल की कुणालाही हा क्रमांक सांगितला तर ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या घराच्या मॅपसह सगळी माहिती क्षणात उपलब्ध होईल.



_*काय फायदा होणार?*_

एखाद्या जागेच्या पत्त्याचा ईलॉक माहिती करुन घेतल्यावर तुमच्या समोर त्या जागी जायचे कसे याची माहिती मॅपसह सादर होईल. तसेच शहर आणि गावांनाही ईलॉक दिले  जाणार आहेत. त्यामुळे एखाद्या गावात जाणे सोपे होईल. कारण त्या गावाचा रस्ताच तुम्हाला मॅपच्या माध्यमातून दिसेल.

_*सरकारचा प्लॅन काय?*_

एकदा का हा पायलॉट प्रोजेक्ट यशस्वी झाला कि, ईलॉकला तुमची सगळी माहिती लिंक केली जाणार आहे. जसे कि, तुम्ही विजेचे बिल किती भरता, तुमचे पाण्याचे बिल किती आहे, तुम्ही इन्कम टॅक्स किती भरता, तुमच्याकडे कोणकोणती प्रॉपर्टी आहे आदी माहिती सहज उपलब्ध होईल.

_*काळा पैसे दूर होणार!*_

ईलॉक सादर केल्यावर एखाद्या व्यक्तीकडे किती प्रॉपर्टी आहे, त्याचा फ्लोअर एरिया किती आदी माहिती सरकारकडे सहज उपलब्ध होईल. कोणत्याही माहितीची शहानिशा करणे सरकारला अवघड जाणार नाही. त्यामुळे काळ्या पैशांवर अंकूश लावणे सरकारला सहज शक्य होणार आहे.

राग काटकसरीने कसा वापराल?

*रागातल्याऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?* प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे,...